समाज एक मुक्त चिंतन

एक अटळ संघर्ष .....एकच वाट शिक्षण 

#समाजभान  आणि #राजकरण ......एक #चिंतन विषय

https://fb.watch/mXT492IHhA/?mibextid=Nif5oz

१) रक्षणा सलगर (राष्ट्रवादी)
२) गोपीचंद पडळर( भाजपा)
३) लक्षण हाके (शिवसेना)

धनगर  समजतील राजकीय लोकांसाठी काही राजकीय शिष्टाचार आहेत का....??

समाज हितासाठी बोलणे वेगळे आणि त्यासाठी कुठलीही सभ्यता न पाळणे हे कितपत योग्य आहे...??

नको तिथे राजकारण करणे म्हणजे  आणि विरोधी लोकांना शिव्या देऊन स्वतःला मोठे करणे हे धोरण समाजासाठी किती किती योग्य आहे ....??

मला वाटत समाजमन अश्या पद्धतीने पुढे जाणे ही धोक्याची घंटा आहे ज्याचा पद्धतीचा भारतीय राजकारणात कधीच स्वीकार होणार नाही ज्याचा वर्तमान आणि भविष्य हे नक्कीच वाईट नोंद घेतल्या शिवाय राहणार नाही.....!!!!!!

जेव्हा सामाजिक शिक्षित लोक राजकारणात येतात तेव्हा एक मर्यादा ,राजकीय शिस्त आणि विचारांचा वारसा यांच्याशी झुंज देत आपण पुढे जात असतो पण तसे होताना कुठेही दिसत नाही(शिक्षित समाज ह्यापासून दूर जाताना दिसत आहे)

आणि आज तसे होताना दिसत नाही माझ्या गावापासून ते राज्याच्या मोठ्या सामाजिक नेतृत्वात राजकीय सभ्यता कुठेच दिसत नाही कधी राजकारणात गुंड तर कधी स्वा.पणा मिरवणारी पुढारी मंडळी उदयभिमुख होऊ पाहत आहेत आणि एक सर्वसामान्य जनता चागला पर्याय नसल्यामुळे  ह्या सर्वांना डोक्यावर घेत आहेत, असा सामाजिक प्रवास राजकारणात किती पुढे जाईल ह्याची शास्वती देते आज तरी अवघड आहे ..

ह्यातून आपणास खालील प्रश्न सहज मनात येऊ शकतात 

१) असे करून समाजाला न्याय मिळेल का ? 
२) समाजाच्या राजकीय सोडून शैक्षणिक ,औद्योगिक समस्या सुटतील का?
३) राजकारणातील समाजाची प्रतिष्ठा वाढीस लागेल का?
४) सर्व समाज व्यापक नेतृत्व मिळेल का?
५) राष्ट्र हित असेल अशा काही गोष्टी आमच्या राजकीय व्यक्ती कडून होतील का?
६) सामाजिक अर्थकारण ह्या विषयावर कधी भेटी/कार्यक्रम होतील का?
७) समजतील सेवाभावी प्रकल्प असलेली समाज मन  कधी एकत्र येतील का?
८)  सामाजिक संस्कार, संस्कृती जतन कधी होईल का?
९)  समस्या निर्मूलन फक्त सरकार करेल का?
१०) एका आदर्श लोक समूह म्हणून एकत्र येवुन समस्या सुटू शकत नाही का?

अनेक विषय आणि चर्चा होतील परंतु समाज भान असलेली पिढी जन्माला यावी त्यातून एक राष्ट्रीय समाजाची कल्पना समजून घ्यावी लागेल तरच एक आदर्श राष्ट्र प्रगत समाज नक्की उभा राहील असं मला नक्की वाटत ....🌻🙏🌻

✍️ एक  सामाजिक आत्मीय चिंतन लेखन
योगेश वामन मासुळे -८६९८७७९७६८
स्वामी विवेकानंद फाऊंडेशन ,धुळे 
#शिक्षण #आरोग्य #व्यक्तीनिर्माण

#राजकानातून #समाज #विकास (#आरक्षण) एक राजकीय भपका.......एक भ्रमनिरास......!!!!!!!!

आज #मराठा समाजाच्या सत्तर वर्षाच्या राजकीय इतिहासात राज्यामध्ये  नेतृत्वशिष (प्रमुख) असताना त्यांच्याकडून समाजाची व्यवसायिक,शैक्षणिक बिकट परिस्थिती सुधारता आली नाही कारण समजामध्ये छोटे मोठे भेद,एकसंघ विचारंचा अभाव आणि सेवाभावी लोकांची कमतरता असे म्हटले तर वावगे ठरणार नाही,जेवढे आमदार मंत्री आरक्षण स्थळी भेटी द्यायला गेले त्यांनी एकत्रित येऊन (सेवाभावी, प्रायव्हेट, अशासकीय संस्था उभी केली तर  स्व खर्चाने महाराष्ट्रातील सर्व जिल्हा स्थळी हॉस्टेल बांधून गरिबांच्या मुलांना मोफत शिकवू शकतात, परंतू शासनाकडे मागून त्यांना अध्यक्ष व्हायचे आहे आणि त्यातून पुन्हा पैसे खायचे आहेत..)

तर इतर समाज #धनगर समाजाचे चार -पाच आमदार,खासदारांना वेगवेगळ्या पक्षात निवडून जरी आणले  तरी समाजाचे खऱ्या अर्थाने भल होईल का हा मोठा गहन प्रश्न आहे ? कारण सत्तेपूर्वी  आरक्षण साठी आंदोलन करणारे नेते   सत्ता मिळाल्यानंतर (पदाची शपथ घेतल्यावर सार्वभौमत्व स्वीकारतात) असा सुस्पष्ट इतिहास आहे

उलट पक्षी मराठा धनगर समाज हा  सरकार कडे भिक(हक्क असा भावनिक शब्द प्रयोग करून) सांगून वेगवेगळया सोशल/ प्रिंट मीडियावर आपण कसे गरीब आहोत  ह्याचे वेळोवेळी प्रदर्शन करतात जणू  ७० वर्षात आपल्या समाजामध्ये आपल्या तालुक्यात एकही  व्यक्ती शिकला नाही त्यांचा बंगला झाला नाही हे कमी की काय समाजामध्ये एकही वैचारिक,प्रागतिक विचार करणारी व्यक्ती अथवा समूह नाहीत का? आज रोजी दोन्ही समाजामध्ये ज्याच्याकडे पैसे आहेत ते स्वतःला मोठे समजतात आणि ज्याकडे विचार आहेत त्याकडे पैसे नाहीत असे विरुद्ध वातावरणात समृद्ध सांस्कृतिक परंपरा सुद्धा प्रगत झाल्या नाहीत कारण मोठ्याची चापलुशी विचारी लोक करू लागले  परिणामी आज आरक्षण एक आरक्षण करण्याची वेळ उभ्या दोन्ही समाजांवर आली आहे हे न सुटणारे कोडे अनेक बुद्धिजीवी लोकांच्या ठळक पणे  लक्षात आले आहे .

धनगर समाज म्हणून बोलायचं झालं तर समजाच्या ९० % शेतकरी आहेत फक्त १०% मेढपाळ उरलेत त्यांच्यासाठी जिल्हा स्थानी विना सरकारी मदत घेता समाज बांधव शिकतील असी  बोर्डिंग सोय सर्वमुळून का करू शकत नाही.? कारण जर का अशी संस्था किवा बोर्डिंग प्रकल्प कुणी उभा केला तर पुन्हा भांडण तो नाही चालणार/हा नाही चालणार परत राजकारण येईल मग एक प्रश्न ह्यातून पुन्हा वर येतो की तुमच्या आधुनिक,वैचारिक समाजात विनाराजकारण समर्पित सेवाभाव करणारी ,निस्वार्थ प्रकल्प संचालन करणारी दोन चार लोकं नाहीत का.? हा मोठा चिंतनाचा विषय आहे ह्या सामाजिक जीवनाचा......

उलट ज्यांनी कधीच आरक्षणाचे तोंड पाहिले नाही असे #मारवाडी,#जैन,#वाणी,#कुणबी समाज व्यवसाय,शिक्षण घेऊन समाजाची सेवा करण्यासाठी आपापल्या तालुका स्थानी #अराजकीय लोकांचे #समूह एकत्र येऊन(तरुणांना संधी देतात) #सेवाभावी प्रकल्प स्व देणगी ने उभा करतात आणि त्यातूनच जिल्हा स्थानी गरीब समाज बांधवांना एकत्रित #बोर्डिंग सुरू करून समाज मूल्य व्यवस्था बरोबर शिक्षण देतात आणि त्यातून समाजातील दारिद्र्य निर्मूलन स्वतः करतात.

आपल्या समोर ठळक मागील ७० वर्षात आरक्षण शिवाय प्रगती झालेले समाज आहेत तर का आज का आंदोलन करून एक व्यक्ती, बॅनर लावून ,समाजाचा वेळ घेऊन काम करीत आहोत मला अजूनही कळून आलेले नाही...

जर का देशात किंवा ज्या त्या समाजात राष्ट्रीय सेवाभावी  प्रकल्प कसे चालतात किंवा त्यात काम करणारी अराजकीय  तरुण तयार झालीत तर समाज नक्की बदलेल अस माझ ठाम मत आहे.....

आता राष्ट्रीय प्रकल्प कोणते आणि हे शिक्षण देणाऱ्या संस्था  कुठे आहेत याबद्दल माहिती आपण पुढील भागात पाहूया.........क्रमशः 

लेखनाचा एका छोटासा प्रयत्न....
✍️ योगेश वामन मासुळे (पाटील)  - 8698779768
स्वामी विवेकानंद फाऊंडेशन, धुळे महाराष्ट्र 
#शिक्षण #आरोग्य #व्यक्तीनिर्माण

#सामजिक #आदर्श  प्रिय दीपक खंडीकर मुक्काम पोस्ट अक्कलपाडा तालुका साक्री जिल्हा धुळे.

आता कुठेतरी सामाजिक प्रगती रुळावर येत आहे ...........
(फक्त एकच समाजाची मुले न ठेवता सर्वच समजामध्ये आपल्या समजाचा गुणात्मक भाव ठेऊन काम करण्याला जगात Pleasurable महत्व आहे)

आणि ह्या आनंददायी जगात कॉपी करण्यापेक्षा मदत करून समाजाला मोठे करणे आज रोजी महत्वाचे आहे असे आम्ही आत्मिक चिंतनातून बघतो (सामाजिकप्रेम विषयावर Sunil Nerkar  सुनील जी नेरकर,धुळे हे आपल्या सर्वांसाठी  प्रेरणास्थान आहेत)

१९८०/१९९० च्या दशकातील हुषार तरुण वशिला नसल्यामुळे आज वडिलोपार्जित शेती करून स्वतःचे जीवन व्यथित करीत आहेत आणि स्वार्थी राजकारणी लोकांच्या परिवारातील लोक कमी शिकले तरी आज फुल पगारी आहेत) कारण सुवर्ण काळात समाज मोठा होऊ शकला असता हे सर्वांना मान्य करावे की आपल्या सर्वांना की  ४० वर्ष वाया गेली आपल्या समाजाची...???? (आज जे हळदीमध्ये डिजे वर दारू पिऊन नाचत आहेत त्यांचा विषय वेगळा आहे) 
ह्या सर्व पापाचे धनी आजचे सर्वपक्षीय #राजकारणी आहेत कारण त्यांनी कधी स्वर्गीय नामदेव बापू, मोराने ह्यांच्या शिस्तप्रिय आणि विकास आत्मीयतेने  समाजाकडे पाहिले नाही व गरीब मुलांना कधी शिक्षण घेऊन खरी संधी मिळू दिलीच नाही...

खरच मन भरून येत इतक्या स्वार्थी/कठीण महागाईच्या काळात नाममात्र दरात दुसऱ्यांच्या मुलांना शिकवणे सोप काम नाही परतू तरी सुद्धा दीपक दादा सारखे उमेदी तरुण समाज रुपी २४ कॅरेट सोन पुढे येत आहेत आणि त्यांना मोकळे पणे सर्व जण पाठिंबा देत आहेत .....🌻🙏🌻

#परंतु सर्वांनी मिळून #एकदिलाने #मनमोकळे #निस्वार्थी  पणाने राजकीय  कुठलीही अट ठेवता काही वर्ष साठी समाजाची जागा उपलब्ध करून दिली तर प्रचंड #उपकार होतील (आजचा गोंधळ झालेल्या समाजावर) समजाच्या सर्व पुढारी मंडळींचे...(#कारण ह्या जन्मी तरी ते त्या जागेचा स्वतः उपभोग करू शकत नाही आणि कुणी केले तर त्यांना चालणार नाही हा माझा स्व:अनुभव आहे)

आणि जे जे स्वतः पुढारी म्हणत असतील असे आजी माजी सर्वच बुद्धीमंत लोकांनी समाजाच्या जागा(गल्ली न.६ मधील १५०*१५= २,२५०/- अंदाजे स्क्वेअर फूट जीचे आजचे मूल्य अंदाजे ३ कोटी रुपये पर्यंत असेल)  पावले उचललीत तर आम्हाला सुद्धा आनंद होईल अन्यथा..... सामजाच्या सर्वच तरुण.मुलांना कायदेशीर जाणे आपल्याला अपमानाचे होईल असे मला व्यक्तिगत. वाटते ....(ही वेळ हुषार पुढारी येऊ देणार नाही याची सुद्धा पूर्ण खात्री आहे कारण त्यांची साधारणत ४०/३०/२० वर्ष पासून अप्रत्यक्ष लॉबी धुळ्यात प्रत्येक क्षणी/प्रत्येक कार्यक्रमात हजर आहे आणि ती ह्यांना  जाऊन समजावेल अशी आशा आहे)

अनेक लोक इच्छा असून कॉमेंट करणार नाहीत (आम्ही सुद्धा आपल्या सुंदर इतिहासचा आदर करतो विशेष समाजतील प्रत्येक व्यक्तीचे निष्ठा ओळखतो आणि समजतो सुध्दा) 

समाजच भल होत आहे ते पाहून आपल्या डोळ्यात देखील पाणी आले तरी समाज बदलाच्या कामात तुम्ही सुध्दा अप्रत्येक्ष रित्या समाविष्ट आहेत असे आम्ही मानतो..🌻🌻
 
ही #टीका नसून #उपहास आहे ज्यातून समाज प्रगती हाच उदांत हेतू आहे.... 

शेवटी : हृद्य पूर्वक शुभेच्छा दीपक दादा कुठलाही पारिवारिक  सपोर्ट नसताना आमच्या साठी तुम्ही खरे #गिरिश_प्रभुणे, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम  साठी काम करणारे तपस्वी आहात आपल्या उडांत वाढीसाठी हृद्यपूर्वक शुभेछा ...🙏

काय लावलं राव ....बिनडोक समाज आहे कधी सुधारेल ?
एवढं मोठं आंदोलन चालू आहे एक मराठा एक मेका विरुद्ध बोलत नाही जो तो पूर्णतः जबाबदार आहे तरी  आपली राजकीय मर्यादा समजून बोलतो 

मला कायम का वाटत की आपली लोक बिनडोक आहेत...
अरे उद्या हाके जरी सत्तेत गेले तर ते न्याय देतील ?
एवढं सोपं नहीबर (राज्यपाल शपथ उगाच देत नाहीत सार्वभौमत्व वागणुकीची आमदार साहेबांना)
आणि उरला प्रश्न सेनेचा हिंदुत्व हा विषय आहे फक्त आणि आज तो सुध्दा नाही आरक्षण विषय सेनेच्या विचार प्रवाहात येत नाही आपल्या माहितीसाठी ...
हा फक्त समजाच्या जीवावर नेतृत्व मिळवण्याचा प्रयत्न आहे बाकी काही नाही पण मी ठासून सांगतो असे नेतृत्व निवडून आल्यावर  समजाची लायकी काढतील असे माझे स्पष्ट मत आहे मग ते गोपीचंद पडळकर असो का हाके (मर्यादा पाळा सत्ता येते जाते आपण रोज बघतो सुधारणा करा आणि संयमी नेतृत्व ठेऊन राज्य करा हे काही समाजाला देता येईल ते द्या उद्योगी रतून घडवा उद्या  तुमचा उपयोग होईल आणि सामाजिक राजकीय प्रतिभा सुद्धा जाईल)
अण्णा डांगे, डॉ विकास महात्मे सुद्धा आहेत बर आपल्या समाजाचे तरुणांना माहितीसाठी (यांचा सुद्धा आदर्श घेऊ शकतात)

धुळे शहरात तेली (चौधरी) समाजात महाराष्ट्रात जेवढे पक्ष आहेत तेवढ्या पक्षात तेली लोक आहेत कधी ही ते आपल्या माणसाबद्दल वाईट बोलत नाही आपल्या मर्यादा समजतात आणि आपली आपली व्यवसाय करतात त्यामुळे त्यांचा महापौर बनतो प्रत्येक वेळी .....

Comments

Popular posts from this blog

1.चिंतन

6.वाद विरूद्ध प्रतिवाद